कोरोना अपडेट

मुंबईत शाळा बंद

Share Now

राज्यात वाढणारी रुग्ण संख्या चिंताजनक असून राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत शहरात वाढत आहेत, वाढणारी रुग्ण संख्या कमी व्हावी म्हणून शासन वेगवेगळ्या उपाय योजना करत आहे, मुंबईत १५ जानेवारी पर्यंत संध्याकाळी ५ ते सकाळी ५ पर्यंत संचार बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला तसेच सार्वजनिक ठिकाणी मुंबईकरांना मनसोक्त फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

आज मुंबई महानगर पालिकेने वाढणारी रुग्ण संख्या आणि विद्यार्थीची आरोग्याची काळजी म्हणून मुंबईतील पहिली ते नववी पर्यंत शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १० ते १२ पर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात पुन्हा लॉकडाउन लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील आठवड्यात रुग्णसंख्या वाढीने वेग घेतला असून देशातील दिल्ली, पश्चिम बंगाल, या राज्यात शाळा कॉलेज सिनेमागृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज मुंबईतील देखील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . परंतु आताराज्यातील शाळा सुरू राहणार की त्यादेखील बंद होणार असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे ..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *