MPSC मार्फत होणाऱ्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षेचे सुधारित वेळेपत्रक आज आयोगाने जाहीर केले आहेत, जानेवारी महिन्यात घेतल्या जाणाऱ्या तीन परीक्षेचे वेळापत्रक MPSC च्या अधिककृत संकेत स्थळावर जाहीर करण्यात आले आहे.
२ जानेवारी २०२२ राजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ परीक्षा सुधारित वेळापत्रका नुसार २३ जानेवारी रोजी होणार आहे.महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा मुख्य परीकशा २०२० संयुक्त पेपर क्रमांक -१ सुधारीत वेळापत्रक नुसार २९ जानेवारी होणार आहे. याआधी ही परीक्षा २२ जानेवारी राजी होणार होती. तसेच दुय्यम सेवा परीक्षा २०२० पेपर क्रमांक २ पोलीस उपनिरीक्षक परीक्षा आता ३० जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
कोरोना विषाणूच्या प्रार्दुर्भाच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल.
याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता आयोगाच्या संकेतस्थळाचे नियमित अवलोकरन करणे उमेदरवारांच्या हिताचे राहील, असे एमपीएससीने जाहीर केलेल्या पत्रकात सांगितले आहे.
आयोगामार्फत जानेवारी, २०२२ मध्ये नियोजित तीन परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/J1dQq6qWRV
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) January 3, 2022