महाराष्ट्रात लाॅकडाऊनची शक्यता?
दिवसंदिवस झपाट्याने ओमिक्रोन ची संख्या वाढत असून लॉकडाउन लागेल की नाही हा मोठा प्रश्न उदभवत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना लॉकडाउनचा विचार नसल्याचं सांगितलं.
ओमिक्रोन आणि डेल्टासाठी चे उपचार वेगळे आहेत त्यामुळे आरोग्य विभागासमोर हे सर्वात मोठं आव्हान असून ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनहून अधिक लागल्यास राज्यात लॉकडाऊन लागेल असे, राजेश टोपे यांनी स्पष्ट सांगितलं. राजेश टोपे म्हणतात “लॉकडाउन चा सध्या विचार नाही पण निर्बंध वाढतील. राज्यात कठोर निर्बंध लावण्याचं काम सुरु झालं आहे. रुग्णालयात जास्त प्रमाणात बेड, आय सी यू लागू शकते. रुग्णांना किट्स वापरण्याचा सूचना दिल्या असून ओमिक्रोन आणि डेल्टाच्या रुग्णांना ओळखणं गरजेचं आहे. राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग सुरु असून मुंबई पुण्यासारख्या मेट्रो सिटी मध्ये अनेक कठोर निर्णय घेल्या जाऊ शकतात”
लॉकडाउन ची भीती बाळगू नये. पण रुग्ण संख्या आटोक्यात न आल्यास निर्बंध आणखी कडक होऊ शकतात. येत्या काळात परिस्तिथी पाहून आणखी वेगळे निर्णय घेण्यात येतील, कोरोना रुग्णसंख्या 12 ते 15 हजारावर पोहोचण्याची भीती असलायचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.