15-17 वयोगटासाठी आजपासून CoWIN वर नोंदणी,स्लॉट असा बुक करा!
३ जानेवारी पासून देशात १५ ते १७ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु होणार आहे आणि त्यासाठी १ जानेवारी म्हणजे आजपासूनच रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली.COWIN या पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात आला असून तिथून लहान मुलांसाठी आता स्लॉट बुक करता येणार आहे.
या लसीकरण मोहिमेत १५ ते १७ वयोगटातील मुलांसाठी वॉक-इन आणि ऑनलाइन नोंदणी (CoWIN द्वारे) दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.CoWIN नोंदणी 1 जानेवारीपासून सुरू झालीअसून ,ऑनसाइट नोंदणी 3 जानेवारीपासून सुरू होईल.
COVID-19 लसीकरण स्लॉट कसा बुक करण्याची फारसी काही वेगळी प्रक्रिया नाही आहे. या पूर्वी स्लॉट बुक करण्याची जी प्रक्रिया होती तीच फॉलो करावी लागणार आहे.
- वॅक्सिन चा स्लॉट बुक करण्यासाठीCoWIN च्या cowin.gov.in पोर्टल ला भेट द्या
- तीन पर्यायांपैकी एक वापरून साइन इन करा – 1. मोबाइल नंबर आणि OTP, 2. आरोग्य सेतू खाते किंवा 3. उमंग खाते
- नोंदणी केल्यानंतर, तुमची पसंतीची तारीख आणि वेळ निवडून अपॉइंटमेंट बुक करा.
- दिलेल्या यादीतून लसीकरण केंद्र निवडा.
- एक वैध ओळख दस्तऐवज जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड इत्यादी सादर करणे आवश्यक आहे.
- लसीकरण केल्यानंतर, त्यांना त्यासाठी प्रमाणपत्र प्राप्त होईल.
१५ ते १७ वयोगटातील, फक्त भारत बायोटेकचे कोवॅक्सिन प्रशासित केले जाईल तर १५ जानेवारी नंतर तिसरा म्हणजे बुस्टर डोज सुरु होईल .
भारतातील कोविड-19 लसीकरण कव्हरेज शुक्रवारी 145 कोटींहून अधिक झाले असून दिवसभरात लसीचे 52 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत.