देश

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे १२ मृत्यू !

Share Now

जम्मू -कटरा येथील वैष्णोदेवी मंदिरात २०२२च्या पहिल्याच दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मध्यरात्री ३ च्या सुमारास घडली, यामध्ये अनेक भाविक देखील जखमी झाले आहेत. वैष्णोदेवीला प्रथमच हा प्रसन्ग घडला. लाखोंनी भाविक येत असताना या आधी असे कधी झाले नसल्याने प्रशासन चकित झाले आहे.

या चेंगराचेंगरीतील जखमींना वैष्णोदेवी नारायणा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. नववर्षानिमित्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक पोहोचलचे होते. त्यादरम्यान, चेंगराचेंगरी झाली. मृतांमध्ये दिल्ली, हरियाणा, पंजाब येथील भाविकांचा समावेश आहे. काही तरुणांमधील वाद हे या भीषण अपघाताचे कारण होते असे समजते, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, गेट क्रमांक तीनवर काही तरुणांमध्ये वादावादी झाली आणि त्यानंतर काहींना धक्काबुक्की करण्यात आली आणि यादरम्यान लोक पळू लागले. या वादातून चेंगराचेंगरी होऊन १२ जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.रात्री गेट क्रमांक 3 येथे ही घटना घडली. रांगेतील काही लोकांमध्ये वादावादी झाली, त्यानंतर हाणामारी झाल्यानंतर त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे काम सुरू करण्यात आले. असे यापूर्वी कधीच घडले नव्हते. नवरात्रोत्सवात भाविक मोठ्या संख्येने येतात,” असे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *