बीएएमएस च शिक्षण घेणाऱ्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

बीएएमएस च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींने  महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे . ३० डिसेंबर रोजी हि घटना घडल्याचे समोर आले. तरुणीच्या आत्महत्येने महाविद्यालयात खळबळ उडाली. या विद्यार्थीने नैराश्यातून आत्महत्या केली असावी अशी प्राथमिक माहिती समोर आली. या प्रकरणाची पुढील चौकशी पंचवटी पोलीस करत आहेत.

घटना स्थळावरून पोलिसांनी मृत तरुणीचा मोबाइल आणि काही साहित्य हस्तगत केले तसेच.या तरुणीने आत्महत्या का केली असावी  याच कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.

मृत तरुणी बीड जिल्ह्यतील असून नाशिक येथे बीएएमएस  चे शिक्षण घेत आहे. नाशिकच्या श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयात बी.ए.एम. एस च्या तिसऱ्या वर्षाला होती.

सुट्टयांमुळे गावी गेलेली श्रुती दोनच दिवसांपूर्वी महाविद्यालयाच्या वसतीगृहात परतली. मात्र आल्यापासून ति नैराश्यात होती. बुधवारी रात्रिच्या सुमारास श्रुती ही रूमचे दार उघडत नसल्यानं तिच्या मैत्रणीनं वसतीगृहाच्या निरीक्षकांकडे धाव घेतली. त्यानंतर रुमचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी श्रुती ही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *