सिक्कीम मधील रस्त्याला “नरेंद्र मोदी” नाव
एखाद्या रस्त्याला किंवा वास्तूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नाव मिळणं काही नवीन नाही, गेल्या वर्षी गुजरातमधील सरदार वालाभाई पटेल स्टेडियमच नामकरण करून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं होतं, आता सिक्कीममधील मुख्य रस्त्याला देखील नरेंद्र मोदी यांच नाव देण्यात आलं आहे.
सिक्कीममधील सोमगो लेक आणि नाथुला बॉर्डरला जोडणाऱ्या रस्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे. राज्यपाल गंगा प्रसाद यांच्या हस्ते या नवीन रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. गंगटोकशी नाथुला सीमेला जोडणाऱ्या जुन्या मार्गाला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुमारे १९ किमी लांबीचा रस्ता एका वर्षापासून कार्यरत आहे. मात्र, आता राज्यपालांनी त्याचे अधिकृत उद्घाटन केले आहे.
सिक्कीम भाजपचे प्रदेशाध्यक्ष डी.बी.चौहान यांनी रस्त्याच्या उद्घाटनाची माहिती दिली. ट्विटरवर फोटो शेअर करत त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी मार्गाच्या उद्घाटनप्रसंगी माननीय राज्यपाल गंगा प्रसादजींसोबत सहभागी झाले आहेत. कयोंगसाळा ग्रामपंचायतीत या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले.
चौहान म्हणाले, ‘आपली ऐतिहासिक कामगिरी आणि असामान्य नेतृत्व राष्ट्रसेवेसाठी समर्पित करत आहोत.’ पंचायत अध्यक्ष आय.के.रासेली यांच्या नेतृत्वाखाली क्योंगनोस्ला जीपीयूच्या ग्रामसभेने रस्त्याचे नामकरण एकमताने मंजूर केले.
नवीन रस्त्याच्या निर्मितीमुळे गंगटोक ते सोमगो तलावाचे अंतर १५ किमीने कमी झाले आहे.
Pleased to join Hon'ble @Governor_Sikkim Shri Ganga Prasad Ji during the inauguration ceremony of #Narendra #Modi #Marg at Kyongnosla GPU. The newly constructed alternative alignment road towards Changu lake has been named after Hon. PM Shri @narendramodi Ji, 1/2 pic.twitter.com/7GWjz1jpsm
— DB Chauhan (@debe_chauhan) December 28, 2021