कालीचरण महाराजांना अखेर अटक
काही दिवसांपासून कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत होते. कालीचरण महाराज यांच्याविरोधात महाराष्ट्र् , मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले होते पण अटक मात्र झाली नव्हती. आज कालीचरण महाराजांना मध्यप्रदेश खजुराहो येथील बागेश्वरी धाम येथे अटक करण्यात आली आहे. छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराजांना ताब्यात घेतले. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण महाराजांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा उदो उदो केला. या वक्तव्यामुळे कालीचरण महाराज यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला गेला तसेच त्याच्यावर राष्ट्रद्रोहाच गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील झाली. टीकेचे धनी होऊनही महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य काही टाळले नाही. कालीचरणविरोधात रायपूर, अकोला आणि पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मागील काही दिवसांपासून छत्तीसगड पोलिसांकडून कालीचरण महाराजाचा शोध सुरू होता. त्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातही छत्तीसगड पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर खजुराहो येथील बागेश्वर धाम येथील एका घरातून कालीचरणला अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली.
Chattisgarh's Raipur Police arrests Kalicharan Maharaj from Madhya Pradesh's Khajuraho for alleged inflammatory speech derogating Mahatma Gandhi at 'Dharam Sansad'. A case is registered against him in Tikrapara Police Station of Raipur.
— ANI (@ANI) December 30, 2021
——————————