नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी उद्द्या
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल नितेश राणे यांच्यावर झालेल्या गुन्हयाचं स्पष्टीकरण देण्यासाठी घेतलेली पत्रकार परिषद वादात सापडल्याच दिसत आहे. पत्रकार परिषेदेत पत्रकाराने नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून, त्यांच्याकडून नितेश राणेंची माहिती घेण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली असून, आज हजर राहण्याचे आदेश दिले आहे. नारायण राणे यांना काल झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे कुठे आहेत, असा सवाल विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे सांगायला आम्ही मूर्ख आहोत का, असं उत्तर दिलं होतं. आता याबाबतच पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली आहे.
आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. आजच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने उद्याची तारीख दिली आहे. उद्या या जामीन अर्जावर निर्णय दिला जाणार आहे.
या नोटिसमुळे राज्यातील राजकारण चांगलाच तापल आहे. भाजपा मधून इतर नेत्यांनी देखील यावर महाविकास आघाडी सरकारवर टिका केली आहे.
कोणत्याही प्रकारची चूक केली नसताना, केंद्रीय मंत्री मा. नारायण राणे यांना महाराष्ट्राचे पोलिस नोटीस बजावून आमच्या समोर येऊन उभे रहा असे आदेश देतात…
वारे वा..ठाकरे सरकार!
फुले, शाहू, आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन सरकार चालवतो म्हणायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे! pic.twitter.com/309mBmn382— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 29, 2021