कोल्हापूरातील राधानगरी धरणाचा दरवाजा अडकला नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचे दरवाजे आज सकाळी तांत्रिक कामासाठी उघडण्यात आले होते. परंतु यापैकी एक दरवाजा काम सुरु असताना उघडताच अडकला आहे. यामुळे भोगावती नदी पात्रात अचानक जास्त पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी धरणाचा उघडलेला दरवाजा १८ फुटावर अडकला आहे. यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. हा दरवाजा उघडा राहिल्याने भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . पाण्याची वाढती पातळी लक्षत घेऊन नागरिकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
राधानगरी धरणाचा दरवाजा अचानकपणे अडकल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. हा धोका लक्षात घेऊन कोल्हापूरचे पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पाचारण करत आहे, अधिकारी पोचल्यानंतर याबाबतची प्रक्रिया सुरू होईल. तोपर्यंत पाणी वाहत राहणार आहे. दरवाजा बंद होईपर्यंत धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात प्रवाहित होत राहणार आहे, असं सागण्यात आले आहे.