राज्यातील निर्बंध कडक करणार ? राजेश टोपे यांचं महत्वाचं विधान
वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंतेचा विषय ठरत आहे, नागरिकांनी गाफील न राहता शासनाने दिलेल्या नियमच पालन कारण आता गरजेचं आहे. आज राज्यचे आरोग्य मंत्री राजेश यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सांगितले कि, मागील ८ ते १० दिवसातील रुग्ण संख्या बघितली तर जवळपास २० डिसेंबर पासून ११४९२ रुग्ण आढळून आले आहेत, आज मुंबईची तुलना केली तर मुंबई मध्ये २० जानेवारीच्या दरम्यान ३०० जवळजवळ रुग्ण होते, दर दोन दिवसाला रुग्णसंख्या डबल होत आहेत. तसेच ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या ५०० – ६०० असायची पण आता २००० च्या पोस्टिव्ह रुग्ण असू शकतील. मुंबईत रोज ५० हजार टेस्ट केल्या जात आहेत. यात २२०० पॉसिटीव्ह आले तरी ४ टक्के पॉसिटीव्ह रेट आहे. यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे.
दिल्लीतील वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीत मॉल, चित्रपट गृह बंद केले आहेत. या गोष्टी आपण सहजासहजी घेतल्या तर त्याची किंमत चुकवावी लागेल.
काटेकोरपणे नियम पाळावे लागतील अन्यथा रुग्ण वाढ होणे टाळू शकणार नाही.
ओमिक्रोनचे रुग्ण १६७ असून ९१ रुग्ण घरी परतले आहेत. यात मृत्यू दर कमी असला तरी काळजी घेणे गरजेचे आहे. आज राज्यातील वाढत असेलेले रुग्णसंख्य चिंतेचा विषय आहे.
निर्बंधाच्या बाबतीत आज किंवा उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करू निर्णय घेऊ. असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
निर्बंध वाढवण्याची गरज होऊ भासू शकते, कारण लग्न समारंभ आणि कार्यक्रमामध्ये गर्दी होते आणि नियमच उल्लंघन केलं जात.
राज्यात लसीकरण वाढ होणं देखील गरजेचं आहे, लसीकरणाच्या बाबतीत आपलं राज्य मागे आहे. राज्यातील १३ कोटी २१ लाख ९० हजार ३७३ नागरिकांनी
पहिला डोस घेतला आहे. केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगातील मुलांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी आम्ही सज्ज आहोत त्यांना Co vaccine देण्याचा निर्णय झाला आहे. मुलांना शाळेत लास देन्यासाठी आम्ही प्रयत्न करू याबाबत आम्ही विचार करता आहोत.
फ्रन्ट लाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिक याना देखील बूस्टर डोस देण्याबाबत कुठलीही नीयमावली आली नाही.