क्राईम बिट

कोल्हापूर : चिमगावातील दोन सख्ख्या बहीण भावाचा विषबाधेनी दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर शोककळा!

Share Now

कोल्हापूर : चिमगावातील दोन सख्ख्या बहीण भावाचा विषबाधेनी दुर्दैवी मृत्यू, कुटुंबावर शोककळा!

कोल्हापूर जिल्ह्यातील चिमगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सख्ख्या बहिण-भावांचा विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. श्रीयांश रणजीत आंगज (वय 5) आणि काव्य रणजीत आंगज (वय 8) यांचा काल सायंकाळी मृत्यू झाला. दोन्ही मुलांना उलट्या आणि मळमळ सुरू होणं यामुळे त्यांना मुरगुड आणि कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात उपचार घेतले गेले, पण उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

उद्या होणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळा; आझाद मैदानावर सर्व तयारी पूर्ण!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमगाव कागल येथील रणजीत आंगज याच्या कुटुंबाने नातेवाईकांकडून मुलांसाठी कप केक आणला होता, ज्यामुळे मुलांना विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दोन्ही मुलांना उलटी आणि मळमळ होऊ लागल्याने उपचार सुरू करण्यात आले, परंतु त्यांचे जीवन वाचवता आले नाही.

एक साधा वाढदिवस का झाला व्हायरल? वडिलांच्या अनोख्या भेटीचा रहस्यमय क्षण!

यामध्ये श्रीयांशचा मृत्यू मुरगूड येथील खासगी दवाखान्यात झाला, त्यानंतर काव्यला देखील सायंकाळी उपचारासाठी दाखल करण्यात आले, पण तीही उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. तिला कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवले, परंतु तिथे तिचा मृत्यू झाला.

यामुळे चिमगावमध्ये शोककळा पसरली आहे आणि परिसरात या घटनेंची चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर मुलांची आई देखील काही प्रमाणात मळमळ आणि उलटीच्या त्रासाने ग्रस्त झाली आहे. यावर अधिक तपास सुरू आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *