नकली सोन्याच्या विक्रीप्रकरणी खामगावात दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
नकली सोन्याची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; खामगाव पोलिसांनी दोघांना पकडले
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पोलिसांनी मोठा यश संपादन करत नकली सोन्याची विक्री करणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे. या टोळीने गावांमध्ये गाडीवर नकली सोन्याचे दागिने विकून नागरिकांची फसवणूक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यात नकली सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि एटीएम कार्ड्स समाविष्ट आहेत.
गुरुवारी करा हे उपाय, दूर होतील सर्व समस्या
खामगाव पोलीस रात्री पेट्रोलिंग करत असताना एटीएमच्या समोर उभे असलेल्या दोन व्यक्तींना संशयास्पद वागणूक दाखवताना आढळले. तपासानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांच्याकडून नकली सोन्याचे दागिने जप्त केले. हे दोन्ही आरोपी राजस्थान राज्याचे असून, त्यांच्यावर गुजरात आणि राजस्थानमध्ये आधीच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांबाबत आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
किसान आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी यापुढे देखील अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची चेतावणी दिली आहे.