लग्न सोहळा आटोपून सांगलीकडे येताना झाला भीषण अपघात, ३ ठार
सांगलीत भीषण अपघात; लग्न सोहळा आटोपून घरी येताना गाडी नदीत कोसळली
सांगलीतील अंकली येथील कृष्णा नदीच्या पुलावर बुधवारी रात्री एक भीषण अपघात घडला, ज्यात तीन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीरपणे जखमी झाले. कोल्हापूर वरून लग्न सोहळा आटपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने ती थेट नदीपात्रात कोसळली. मृतांमध्ये दोन महिला आणि एक पुरुष आहेत, तर जखमींमध्ये ५ वर्षाचा मुलगा सुद्धा आहे.
तुमच्या घरात आहे का वास्तु दोष? हे संकेत पाहिल्यानंतर लगेच कळेल.
हे कुटुंबीय सांगलीच्या गंगाधर कॉलनी येथील रहिवासी असून, अपघातानंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. मृतांच्या नावे प्रसाद भलचांद्र खेडेकर (४०), प्रेरणा प्रसाद खेडेकर (३५), आणि वैष्णवी संतोष नार्वेकर (२३) आहेत. जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर (४२), वरद संतोष नार्वेकर (२१), आणि ५ वर्षीय समरजित प्रसाद खेडेकर यांचा समावेश आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
सांगलीचे आकाशवाणी केंद्राच्या गंगाधर नगरमधील हे कुटुंबीय सांगलीकडे येत असताना हा अपघात घडला. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, आणि संबंधित प्रशासनाकडून मदतीचे प्रयत्न सुरू आहेत.
Latest:
- ICAR ने रब्बीमध्ये HD3388 गव्हाच्या नवीन जातीची पेरणी करण्याचा सल्ला दिला, शेतकऱ्यांना 125 दिवसांत 52 क्विंटल उत्पादन मिळेल.
- कापसाची किंमत: कापसाची किंमत MSP ओलांडणार, उत्पादनात घट झाल्याने खेळ बदलला
- सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे एक हजार रुपयांचे नुकसान, शासनाची योजना कामी आली नाही
- मक्याच्या या जातींमुळे शेतीचे चित्र बदलेल, एक हेक्टरमध्ये 100 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळेल