पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन वर्षात तीन मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित करून नवीन वर्षाची मोठ्या घोषणा केल्या आहेत, कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन त्यांनी आज या घोषणा केल्या आहेत.

१ ) १५ ते १८ वयोगटातील लहान मुलांच्या लसीकरणास सुरुवात करणार आहे. ३ जानेवारी २०२२ पासून लहान मुलांचे लसीकरण सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

२) आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस १० जानेवारीपासून सुरू करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

३) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसरी मोठी घोषणा केली ६० वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी त्यातही जे कोमॉर्बिड आहेत त्यांच्यासाठी केली. त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्री कॉशनरी लस घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल असं पंतप्रधान म्हणाले.

अनेक देशात ओमायक्रॉनचे संकट आले आहे. ओमायक्रॉनचा भारतातीस संसर्ग वाढत आहे. ओमायक्रानच्या पार्श्ववभूमीवर काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याची गरज आहे. नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे. व्हायरस म्युटेट होत असल्याने आव्हाने देखील वाढले आहे. लसीकरण हे कोरोनो विरोधी लढाईतलं मोठं शस्त्र आहे. भारतानं आतापर्यंत १४१ कोटी डोस दिले आहेत. देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *