राजकारण

सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडीची याचिका फेटाळली, पुढे काय?

Share Now

ईव्हीएमवर संशय, शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे, कारण महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळाले. निकालामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजी दिसून आली आहे. यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी फेटाळली आहे.

नवीन नियमांनुसार केवळ 22 टक्केच लाडक्या बहिणी पात्र; ‘या’ नेत्याचे सरकार स्थापन होण्यापूर्वी वक्तव्य

सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमविरोधातील याचिका फेटाळताना, “पराभव झाला तर ईव्हीएममध्ये बिघाड आणि निवडणूक जिंकली तर ते यश असं कसं होऊ शकतं?” असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर, मतदारांना प्रलोभन देण्यासंबंधी कठोर भूमिका घेत, पैसे, दारू किंवा अन्य वस्तूंचे वाटप केल्यास उमेदवाराला पाच वर्ष निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याचे सांगितले.

महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पुण्यातील एका मतदारसंघात मतमोजणीचे आकडे दिले, जिथे मतदान 3,65,000 होते, पण मतमोजणी 3,74,547 झाली. यावरून आव्हाड यांनी “या 9 हजार मतांचा स्रोत काय?” असा सवाल उपस्थित केला आणि मतमोजणीमध्ये मॅनूप्लेशन झाल्याचा आरोप केला. हे आरोप राज्यभरातील मतदारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण करत असून, महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील खदखद उघड केली आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *