क्राईम बिट

धुळ्यातील टोल नाक्यावर तरुणांचा राडा, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

Share Now

धुळ्यातील टोल नाक्यावर तरुणांचा राडा, १२ जणांविरोधात गुन्हा दाखल
धुळे-सोलापूर महामार्गावर स्थित बोरविहीर फाट्याजवळील टोल नाक्यावर सोमवारी सायंकाळी मोठा राडा झाला. गावातील मुलांना नोकरी न देण्याचा आरोप करत काही तरुणांनी टोलनाका कर्मचाऱ्यांवर हल्ला केला आणि तोडफोड केली. या घटनेत १२ जणांविरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्रीपदाची चर्चा तापली; शपधविधीची नवी अपडेट आली समोर

गावातील मुलांना नोकरी का नाही?
गावातील युवकांमध्ये निराशा असून, त्यांना नोकरी मिळत नसल्याचा संताप उमठला आहे. यामुळे १० ते १२ जणांचा एक गट टोल नाक्यावर जमला आणि त्यांनी कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. ते फक्त दमदाटी करत नव्हते, तर “आम्ही टोलनाका बंद करून ठेवू” अशी धमकी देखील दिली.

शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांचा शपधविधी; कोणाचे किती मंत्री जाणून घ्या

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू
घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. फुटेजमध्ये हल्ला करणाऱ्यांचे स्पष्ट चित्र दिसत असल्याने पोलिसांना पुढील तपासास मदत होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दहशत निर्माण करण्याचा आरोप
टोलनाका चालक सारांश भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हल्ला करणाऱ्यांनी टोलनाक्याच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. “आम्ही टोलनाका चालू ठेवू देणार नाही” अशी धमकी देत त्यांच्यावर दहशत निर्माण केली, असेही त्यात म्हटले आहे.

धुळे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला असून, याप्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Latest:

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *