मुख्यमंत्रीपदाची चर्चा तापली; शपधविधीची नवी अपडेट आली समोर
मुख्यमंत्रीपदाची चर्चा तापली; शपधविधीची नवी अपडेट आली समोर
महायुतीचे विजयाचे हर्षोल्हास व मुख्यमंत्री निवडीचा पेच: दिल्लीतील बैठकीनंतर होणार निर्णय
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय प्राप्त केला असून, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीने 230 आमदार निवडून आणले, तर महाविकास आघाडीला फक्त 46 आमदारांपर्यंतच मर्यादित राहावे लागले. शिवसेनेच्या 20 आमदारांनाही मोठा पराभव सहन करावा लागला. परंतु, यानंतर महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर पेच निर्माण झाला आहे. भाजपच्या 132 आमदारांसोबत, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनेही निवडणुकीत महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. या संदर्भात दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा आणि पेच
महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी कोण ते स्पष्ट झालेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे यश महत्त्वाचे असले तरी देवेंद्र फडणवीस यांच्याही नेतृत्वाची चर्चा आहे. या दोन्ही नेत्यांमधून एकाचे नाव निश्चित करणे हे महायुतीसमोर मोठे प्रश्न आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिन्ही पक्षाचे प्रमुख अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठकीसाठी पोहोचले असून, तेथेच यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
दिल्ली दौऱ्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, 29 नोव्हेंबरला शपथविधी होण्याची शक्यता आहे. यानंतर मंत्रिमंडळाच्या इतर मंत्र्यांचे शपथविधी देखील होणार आहेत. या शपथविधीच्या तयारीला अंतिम रूप दिल्या जात असून, युतीतील विजयी उमेदवारांना या संदर्भात कोणत्याही वादातून वाचावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.