शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यांचा शपधविधी; कोणाचे किती मंत्री जाणून घ्या
महायुती सरकारचा शपथविधी मंगळवारी, 20 मंत्र्यांचा समावेश
महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी महायुतीच्या शपथविधीचा कार्यक्रम होणार असून, या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये शिवसेनेचे 5, राष्ट्रवादीचे 5 आणि भाजपचे 10 मंत्री असतील.
लाडकी बहीण योजना :- महायुतीच्या विजयानंतर “लाडकी बहीण योजने” चा विस्तार
मुख्यमंत्रिपदाच्या शंकेवर अजूनही सस्पेंस
महायुतीच्या ऐतिहासिक यशानंतर आता मुख्यमंत्रीपदावर कोण विराजमान होईल याबाबत शंकेचे वातावरण आहे. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून, देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदासाठी एक प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब
शिवसेनेतून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई यांची मंत्रीपदी निवड निश्चित झाली आहे. तर राष्ट्रवादीतून अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांचे मंत्रीपद ठरले आहे.