लाडकी बहीण योजना :- महायुतीच्या विजयानंतर “लाडकी बहीण योजने” चा विस्तार
लाडकी बहीण योजना :- महायुतीच्या विजयानंतर “लाडकी बहीण” योजनेचा विस्तार; 13 लाख महिलांना मिळणार लाभ
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या विजयानंतर राज्य सरकारने महिलांसाठी “लाडकी बहीण योजना” आणखी मजबूत करण्याची तयारी केली आहे. यानुसार, राज्यभरातील 13 लाख महिलांचे अर्ज प्रलंबित होते, ते आता मंजूर करण्यात येणार आहेत. या महिलांना डिसेंबर महिन्यापासून योजना लाभ घेण्यास सुरुवात होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी महायुतीला दिले “हे” थेट आव्हान, जाणून घ्या
या योजनेत लाभ घेणाऱ्या 2.34 कोटी महिलांना राज्य सरकार दर महिन्याला 1,500 रुपये देत आहे, परंतु महायुतीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार ही रक्कम वाढवून 2,100 रुपये करण्यात येणार आहे. यासाठी सरकारला तरतूद वाढवावी लागणार आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी हे पहिल्या फेरीत घेतले जाणारे निर्णय असू शकतात.
मुख्यमंत्रिपद आणि युगेंद्र यांच्या उमेदवारीबाबत अजित पवारांचं “हे” मोठं विधान
“लाडकी बहीण योजना” सुरू केल्यानंतर महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले आहे. योजनेचा सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यातून झाला असून, त्यानंतर नाशिक, ठाणे आणि मुंबई येथील महिलांनाही मोठ्या प्रमाणावर या योजनेचा फायदा मिळाला आहे.
महायुतीची पत्रकार परिषद | मुंबई |
पूर्वी महिला आणि बाल कल्याण विभागाचे मंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे होते, आणि त्यांनाच या विभागाचे पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांनी विरोधकांवर विजय मिळवला आहे, ज्यामुळे त्यांना या खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.