मुख्यमंत्रिपदावर शिंदेंनी केली थेट घोषणा, फडणवीस आणि अजित पवारांचे काय असेल स्थान?
मुख्यमंत्रिपदावर शिंदेंनी केली थेट घोषणा, फडणवीस आणि अजित पवारांचे काय असेल स्थान?
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताच महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. यासोबतच शिवसेना शिंदे गटाचा जोरदार विजय झाला आहे, तर अजित पवार गटानेही चांगली कामगिरी केली आहे. या यशानंतर राज्यात महायुतीच्या नेतृत्वात सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, आणि मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू आहे.
बारामतीत अजित पवारांनी घेतला बदला, महाविकास आघाडीला मोठा धक्का
एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत यशाच्या कारणांवर प्रकाश टाकला आणि विकासकामांना प्राधान्य दिल्याचा दावा केला. “आम्ही विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालली,” असं ते म्हणाले. त्याच वेळी विरोधकांनी लाडक्या बहीण योजना आणि इतर कल्याणकारी योजनांवर टीका केली होती, पण शिंदे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देताना, “लाडक्या बहिणींनी त्यांना त्यांची जागा दाखवली” असे सांगितले.
शिंदे, भाजपा, अजित पवारांचा नोट जिहाद, ठाकरेंचा घणाघात
मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार, याविषयी एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की, तीनही पक्ष एकत्र बसून या मुद्द्यावर निर्णय घेतील. शिंदे यांनी विरोधकांना टोलाही लगावला, “पराभव झाल्यावर ईव्हीएमला दोष दिला जाईल,” असे ते म्हणाले. त्यांचा हा सूचक संकेत महाविकास आघाडीतील संभाव्य प्रतिक्रिया दर्शवतो.