महायुतीने एवढ्या जागांवर घेतली आघाडी, एक्झिट पोल ठरले खोटे
महायुतीने एवढ्या जागांवर घेतली आघाडी, एक्झिट पोल ठरले खोटे
महायुतीने एक्झिट पोल खोटे ठरवले, २१८ जागांवर आघाडी; महाविकास आघाडीला मोठा धक्का
२० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये दिलेले अंदाज उलटले असून, महायुतीने शानदार बाजी मारली आहे. विविध एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेसाठी १६० जागा मिळतील, असे अंदाज व्यक्त करण्यात आले होते, मात्र महायुतीने या अंदाजांना खोटे ठरवित २१८ जागांवर आघाडी घेतली आहे.
महायुतीच्या विजयावर प्रविण दरेकरांचा दावा, ‘हे’ होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
भाजप १२८ जागांवर आघाडीवर असून, एकनाथ शिंदेंची शिवसेना ५४ जागांवर, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ जागांवर आघाडी घेतली आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीला विधानसभेत मोठा धक्का बसला आहे. एक्झिट पोलमध्ये ज्या महाविकास आघाडीला लोकसभा यशानंतर मजबूत स्थिती होती, ते विधानसभेत फक्त ५१ जागांवर आघाडी घेत आहे. काँग्रेस २०, ठाकरेंची शिवसेना १८ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार १३ जागांवर आघाडीवर आहेत.
शिंदे, भाजपा, अजित पवारांचा नोट जिहाद, ठाकरेंचा घणाघात
महायुतीच्या या प्रचंड विजयामुळे मविआला मोठा धक्का बसला आहे, आणि आगामी सरकार स्थापनेसाठी महायुतीची स्थिती मजबूत झाली आहे.