महायुतीच्या विजयावर प्रविण दरेकरांचा दावा, ‘हे’ होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री
महायुतीच्या विजयावर प्रविण दरेकरांचा दावा, देवेंद्र फडणवीस असणार नवा मुख्यमंत्री
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार महायुतीला जनतेने मोठा कौल दिला आहे. भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असल्याने राज्याच्या नव्या मुख्यमंत्रीपदावर चर्चा सुरू झाली आहे. यावर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
गृहकर्ज घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात, जाणून घ्या
प्रविण दरेकर यांनी विरोधकांच्या टीकांना उत्तर देताना म्हटलं, “विरोधक नेहमीच द्वेष आणि मत्सराच्या आधारे टीका करत होते, पण मतदारांनी शांतपणे मतदान केले आहे.” तसेच, लोकसभेतील चुकांची दुरुस्ती महाराष्ट्राने केली असल्याचं ते म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यात काही त्रुटी झाल्याची खंत लोकांच्या मनात होती, असं दरेकर यांनी स्पष्ट केलं.
शिंदे, भाजपा, अजित पवारांचा नोट जिहाद, ठाकरेंचा घणाघात
महायुती सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात लोकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेल्या कामांचा पाठिंबा जनतेला मिळाल्याचं दरेकर यांनी सांगितलं. “केवळ शिव्या देणाऱ्यांच्या मागे जनता गेली नाही,” असं ते म्हणाले.