फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांचे विजयाचे संकेत? एक्झिट पोलचा अंदाज
Fulambri Matdarsangh | फुलंब्री मतदारसंघातून अनुराधा चव्हाण यांचे विजयाचे संकेत??
२० नोव्हेंबर रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासंदर्भात सकाळ समूहाने एक्झिट पोल जाहीर केला असून, फुलंब्री विधानसभा मतदारसंघात भाजपाची आघाडी दिसून येत आहे. भाजपाकडून अनुराधा चव्हाण उमेदवार आहेत आणि त्यांचा विजय संभाव्य असल्याचे या एक्झिट पोलमध्ये दाखवण्यात आले आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार खामगावमध्ये फुंडकर होणार विजयी
फुलंब्री मतदारसंघात भाजपाच्या अनुराधा चव्हाण यांचा मुख्य प्रतिस्पर्धी काँग्रेसचे विलास औताडे होते. या दोन पक्षांतील थेट लढतीची शक्यता होती. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती, ज्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपाला फायदा होऊ शकतो.
पालघरमध्ये शिंदे गटाची आघाडी; राजेंद्र गावित यांच्या विजयाचे संकेत
या निवडणुकीत ७२% मतदान झाले असून, हे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत २ टक्क्यांनी जास्त आहे. मतदानाचा वाढलेला आकडा, तसेच तरुण मतदारांचा कल भाजपाकडे दिसून आला आहे. दुपारच्या सत्रात वयोवृद्ध आणि सामान्य नागरिकांनी जास्त मतदान केले.
शिंदे, भाजपा, अजित पवारांचा नोट जिहाद, ठाकरेंचा घणाघात
एक्झिट पोलनुसार, महायुतीच्या विजयाच्या आशेने भाजपाच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता २३ तारखेला निकाल आल्यावरच या मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होईल.