अहमदनगरमध्ये “नो वॅक्सिन नो एण्ट्री” – जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
राज्यात दिवसेंदिवस कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची रुग्ण वाढत आहेत. ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारने कालच निर्बंध लावले आहेत. यावर अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’ हा उपक्रम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
ओमायक्रॉन पहिला रुग्ण अहमदनगर जिल्ह्यात निघाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नो वॅक्सिन नो एन्ट्री ही मोहिम आजपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू नये आणि लसीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाऊ दिले जाणार नाही. असे असे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत