क्राईम बिट

अनिल देशमुख हल्ला प्रकरणी मोठा ट्विस्ट! रुग्णालयातून डिस्चार्ज घेताच दिला हल्लेखोरांना इशारा

Share Now

अनिल देशमुख यांच्या वाहनावर हल्ला, सोडणार नाही हल्लेखोरांना; डिस्चार्ज मिळाल्यानंतर दिला इशारा
सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला. हल्ल्यात देशमुख जखमी झाले असून त्यांना डोक्याला मार लागला होता. हल्ल्यानंतर देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर देशमुख यांनी हल्लेखोरांना कठोर शिक्षा दिली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

एअर प्युरिफायरशिवायही घरातील हवा कशी स्वच्छ ठेवावी, घ्या जाणून

घटनेची माहिती मिळताच राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अनिल देशमुख हे नरखेड येथून काटोलकडे जात असताना त्यांच्या गाडीवर बेलफाट्याजवळ दगडफेक झाली होती. या हल्ल्यामुळे गाडीची समोरची काच फोडली गेली आणि देशमुख जखमी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *