Uncategorizedमहाराष्ट्र

महिलांवरील अत्याचारांना बसणार चाप; विधानसभेत शक्ती विधेयक मंजुर..

Share Now

महिला व बालकांवर होणारे वाढते अत्याचार नजरे समोर ठेऊन राज्य सरकारने आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रस्तवित कायद्याच्या चौकट बळकट करण्यासाठी शक्ती कायदा एकमताने दोन्ही सभागृहात मंजूर केला आहे. विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहातील मंजुरीनंतर ते राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल.

बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा Rarest of rare प्रकरणात फाशी शिक्षा तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड असेल.

बलात्कार प्रकरणी अजामीनपात्र गुन्हा Rarest of rare प्रकरणात फाशी शिक्षा तरतूद, अथवा जन्मठेप आणि दंड ठोठावण्यात येईल.

सामूहिक बलात्कार – २० वर्ष कठोर जमठेप शिक्षेची तरतूद किंवा मरेपर्यंत जन्मठेप १० लाख रुपये दंड किंवा मृत्युदंड

१६ वर्षाखालील मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी कठोर जन्मठेप किंवा मरेपर्यंत जन्मठेप दहा लाख रुपये दंड

पुन्हा पुन्हा महिला अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना मरेपर्यंत जन्मठेप शिक्षा

बलात्कार प्रकरणी तपसास सहकार्य न करणाऱ्या सरकारी सेवकाला दोन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड

महिलेचा कोणत्या पद्धतीचे छळ केल्यास किमान दोन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड ,

सोशल मीडिया, मेल, मेसेज, इलेक्ट्रॉनिक मीडिया माध्यमातून महिलांवर कमेंट करणे, धमकी देणे, चुकीची माहिती पसरवणे यासाठी पण शिक्षेची तरतूद आहे.

बऱ्याचदा द्वेष बाळगून ऍसिड हल्ला केला जातो, अश्या गुन्ह्या अजमीनपात्र असेल.

वरील कुठल्याही गुन्ह्यात आरोपी असल्यास सगळे गुन्हे अजमीनपत्र असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *