त्यांच्या नादी त्यांचे…” चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जोरदार टीका
चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जोरदार टीका
चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा: महायुतीला पूर्ण बहुमत, काँग्रेसचा जाहीरनामा धूळ खात पडला
विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत महायुतीच्या विजयावर विश्वास व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “पूर्ण बहुमताने महायुती सरकार येणार आहे आणि आम्हाला 165 जागांपेक्षा अधिक मिळतील.” बावनकुळे यांनी काँग्रेसचा जाहीरनामा ‘धूळ खात पडलेला’ असल्याचा दावा करत महाविकास आघाडीवर हल्ला केला.
कल्याण पश्चिममधील प्रचारात अति उत्साहाचा धोका; उमेदवाराच्या केसांना लागली आग
चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांवर जोरदार टीका
शरद पवार यांनी ‘कुणाचाही नाद करा, पण माझा नाद करू नका’ अशी टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “त्यांच्या नादी त्यांचे लोक लागले आहेत. आमच्याकडे मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारकडे एवढं काम दिलं आहे की जनतेला आम्ही सेवा दिल्यानेच मतदान मिळतं.”
जळगाव शहरात घडली धक्कादायक घटना; अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर आरोप
महाविकास आघाडी आणि महायुतीकडून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहिरातींचा वाद वाढला आहे. बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या जाहिरातेला खोटी ठरवताना काँग्रेसवर टीका केली आणि सांगितले की, “जनतेने काँग्रेसला चार महिन्यात सोडलं. लोकसभा निवडणुकीचा परफॉर्मन्स महाविकास आघाडीच्या बाजूने नव्हता, तो पुन्हा होणार नाही.”
Exclusive: Ground Report & Analysis मध्य -छत्रपती संभाजीनगर!
प्रियंका गांधीच्या रोड शोमधील राड्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया
काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या रोड शोमध्ये झालेल्या राड्यावर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली. “राहुल गांधींच्या आरक्षणाबाबतच्या विधानांमुळे जनतेच्या मनात चीड आहे,” असं ते म्हणाले.
Latest:
- ICAR ने रब्बीमध्ये HD3388 गव्हाच्या नवीन जातीची पेरणी करण्याचा सल्ला दिला, शेतकऱ्यांना 125 दिवसांत 52 क्विंटल उत्पादन मिळेल.
- शेतकऱ्यांनी गव्हाच्या पेरणीसाठी या 6 सुधारित वाणांचा वापर करावा, पुसा येथून बियाणे मागवण्यासाठी याप्रमाणे नोंदणी करा
- 750 रुपयांच्या डोसने गाय, म्हैस, वासरू देतील जन्माला ! हे तंत्रज्ञान पशुपालकांसाठी आहे वरदान, वाचा सविस्तर
- तेलबिया अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे, २१ राज्यांतील शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याची तयारी