अटल बिहारी वाजपेयी एक तेजस्वी भारतरत्न
प्रत्येक पक्षाला एक वारसा असतो, कुणी तरी एक असा नेता होऊन जातो की , पक्ष म्हणून नाही तर त्याची एक उत्तुंग व्यक्ती म्हणून ओळख असते.
तसेच एक अटल बिहारी वाजपेयी केवळ एका पक्षाचे नाही तर भारताचे नेते झाले. त्यांच्या वक्तृत्त्वाने, अभ्यासाने आणि संयमी वृत्तीने त्यांना सर्वस्तरातून मान्यता मिळली, काल पर्यंत त्याच्या सारख्या नेत्यांनी भारतीय राजकारणात सुसंस्कृत पण जपून ठेवला होता केवळ राजकीय हित न जोपासता जनहीत डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी आपली कारकीर्द गाजवली आहे.
उत्कृष्ट संसदपटू, कवी मनाचा राष्ट्रनेता, मुत्सद्दी राजकारणी अशी ओळख असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनप्रवास राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यासाठी प्रेरणादायी आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे अंतर्गत व परकीय धोरणास आकार देण्यात एक पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, विविध स्थायी समित्यांचे अध्यक्ष व एक विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी समर्थपणे भूमिका बजावली.
भारताप्रती असलेले त्यांचे निस्वार्थ समर्पण व पन्नास वर्षाहून अधिक काळ देशासाठी दिलेल्या निस्पृह सेवेबद्दल त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. आज 97 व्या जयंतीनिमित्त अटलजींना अभिवादन.