८३ च्या विश्वचषकाचा थरार आता मोठ्या पडद्यावर बघा !
१९८३ हे वर्ष भारतासाठी इतिहास घडवणारे आणि इतिहास बदलणारे वर्ष होते. पहिल्यांदाच भारताने क्रिकेटमध्ये आपला पराक्रम गाजवला आणि एकदिवसीय स्पर्धेचा विश्वचषक भारताच्या नावावर नोंदवला.खेळाडूंचा संघ परदेशात जातो, कुणी अपेक्षा करत नाही आणि गांभीर्यानेही घेत नाही. अशा परिस्थितीत स्वतः संघातील लोकांना काही करू शकतील ह्याचे गांभीर्य नव्हते. पण उत्साह आणि भक्कम इराद्याने संघाच्या लिडर ने संपूर्ण कथाच बदलून टाकली. त्या जगजेत्या टीमचा धडाकेबाज कर्णधार -ज्याचं नाव कपिलदेव ! भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णपान लिहिणारा अष्टपैलू खेळाडू. इतिहास घडला ती तारीख होती २५ जून आणि मैदान होते लॉर्ड्स, ज्याला क्रिकेटचा मक्का म्हणतात. … भारतासमोर दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिज होता. या इतिहासाचे मोठ्या पडद्यावर सादरीकरण झालं असून 83 आज रिलीज झालाय.
तो क्षण
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पण वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीकांत (३८), अमरनाथ (२६) आणि पाटील (२७) वगळता भारतीय फलंदाज फार काही करू शकले नाहीत आणि संपूर्ण संघ ५४.४ षटकांत १८३ धावांत सर्वबाद झाला.वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली आणि एका विकेटच्या बदल्यात ५० धावा केल्या. प्रेक्षक गॅलरीत वेस्ट इंडिजचे समर्थक आधीच विजयाची जय्यत तयारी करत होते, पण त्यानंतर मदनलालने हेन्स आणि व्हिव्हियन रिचर्ड्सच्या विकेट घेत सामन्याची रंगत बदलून टाकली.अमरनाथनेही तीन विकेट घेतल्या आणि वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ ५२ षटकांत १४० धावांत गारद झाला.भारताने ४३ धावांनी विजय मिळवत भारताने प्रथमच विश्वविजेतेपदावर कब्जा केला.
दरम्यान, हा 83 चित्रपट आज रिलीज झाला आणि दुसरीकडे ट्विटर वर #BoyCut83 ट्रेंड होतेय. दीपिका पदुकोणने जेएनयूच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ हात पुढे केल्यानंतर लोकांची नाराजी अनेकदा दिसून आली आहे. दीपिकाच्या प्रॉडक्शनने ‘तुकडे-तुकडे गँग’ला पाठिंबा दिल्याचे सांगून लोकांना हा चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले जात आहे. दीपिकाचा ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित होत असतानाही लोकांचा राग असाच होता.
लोकांनी या चित्रपटावरही बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.याशिवाय सुशांतचे चाहते चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. लोक याला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट बनवण्याबद्दल बोलताना दिसत आहेत. काही ट्विटरकर्त्यांनी #Boycott83 म्हणत सुशांतच्या चाहत्यांना आठवण करून दिली आहे की रणवीरचा चित्रपट 83 थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. सुशांतच्या चाहत्यांचा आरोप आहे की, रणवीरने गेल्या वर्षी त्याच्या एका जाहिरातीत त्याचा आवडता कलाकार सुशांतची खिल्ली उडवली होती.त्यामुळे आता वापरकर्ते सुशांतच्या सर्व चाहत्यांना #Boycott83 ट्रेंड करण्याचे आवाहन करत आहेत. रणवीरने याआधीही अनेकदा सुशांतची खिल्ली उडवली असल्याचा आरोप यूजर्स करतात.
आता कोणता हॅशटॅग चालतो ते बघणं मनोरंजक ठरेल. प्रेक्षक 83 बघतात की नाही हे बॉक्स ऑफिस सांगेलच.-
Pic credit – news 18