राजकारण

विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक कुणासाठी ठरणार ‘मंगल’ वार. !

Share Now

*विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक*
*कुणासाठी ठरणार ‘मंगल’ वार!*
चर्चेत आहेत चव्हाण, पवार, राऊत, थोपटे

महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यावर काँग्रेसचे नाना पटोले यांनी काही दिवस विधानसभा अध्यक्ष पदाची जवाबदारी सांभाळली परंतु त्यांना पक्षाने प्रदेश अध्यक्षपद दिल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्ष पद मात्र सोडलं होत.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवल याना पदभार सांभाळला. मात्र अध्यक्ष पदाची जागा खाली असल्याने निवडणूक कधी होणार, आणि कुणाची वर्णी लागणार हा प्रश्न कायम होता.

पुढील आठवड्याभरात विधानसभेला नवा अध्यक्ष मिळणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या २८ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी बाजी मारतात की विरोधक याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आज सकाळी कामगार सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यक्रम ठरला. येत्या २८ डिसेंबर रोजी आवाजी मतदानाने ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी येत्या २७ डिसेंबर रोजी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे नव्या अध्यक्षाच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

विधानसभा अध्यक्षाची निवड आवाजी मतदानाने होणार आहे, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये अशी म्हणून आवाजी मतदान घेतलं जाणार अशी चर्चा चालू आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी शर्यतीत काँग्रेसकडून तीन नावे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. त्या सर्वाधिक चर्चा थोपटे यांच्या नावाची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *