राजकारण

संजय राऊत: ‘शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना फोडली, महाविकास आघाडीला १६० जागा मिळतील’

संजय राऊत यांचा हल्लाबोल: ‘शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना फोडली, भाजप आणि शिंदे गटाला देशप्रेमींचा आदर नाही
शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “बाळासाहेबांवर प्रेम असल्यास, बाळासाहेबांची शिवसेना गैरमार्गाने फोडली, विकत घेतली नसती.” तसेच, राऊत यांनी शिंदे आणि भाजपाला देशप्रेमाच्या बाबतीत चांगला आदर नाही, असंही सांगितलं.

राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतल्याशिवाय तुमचा पक्ष एक इंच पुढे सरकत नाही. त्याच बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तुम्ही फोडला. हे तुम्ही बाळासाहेबांवरचं प्रेम समजायचं का?” राऊत यांनी शिंदे गटाच्या राजकीय दृष्टीकोनावर टीका केली आणि शिंदे गटाच्या पाठीमागे भाजपच्या धोरणांचा उल्लेख केला.

नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का: पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, जयंत पाटलांवर आरोप

सावरकर आणि भारतरत्न: भाजपवर प्रहार
राऊत यांनी वीर सावरकरांविषयीही भाजपवर निशाणा साधला. “आम्ही सातत्याने सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. त्यांचा क्रांतिकारक कार्याचा गौरव करा,” असं राऊत म्हणाले. ते म्हणाले, “सावरकरांना भारतरत्न देण्याचं अधिकार अमित शाह यांच्या हातात आहे. तुम्ही ३७० कलम हटवून स्वतःची पाठ थोपटता. मग सावरकरांना भारतरत्न द्या. कुणी अडवले आहे का?”

राऊत यांनी बाळासाहेबांच्या संदर्भातही भाजपवर टीका केली, “बाळासाहेबांसाठी कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. अमित शाह यांची तर अजिबात नाही. तुम्ही तुमच्या पोस्टर आणि बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो लावा, लोकं तुम्हाला महाराष्ट्रात उभं करणार नाही.”

ब्रोकरद्वारे नाही तर घरबसल्या मिळवा लर्निंग लायसन्स, कसे ते घ्या जाणून.

महाविकास आघाडीला किती जागा मिळणार
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागा जिंकण्याच्या अपेक्षांची चर्चा केली. ते म्हणाले, “महाविकास आघाडीला १६० ते १६५ जागा मिळतील.” त्यांनी महायुतीचे सर्व्हे आणि प्रचार तंत्रावर टीका केली, “महायुतीचे लोक लोकांमध्ये भ्रम निर्माण करतात, पण आम्हाला खात्री आहे की हे सरकार पुन्हा निवडून येणार नाही.”

चोऱ्या माऱ्या करून भाजप आणि शिंदे गट जागा जिंकणार
राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या राजकीय धुंदीवर चांगलेच टीका केली. “आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत की चोऱ्या माऱ्या करून भाजप आणि शिंदे गट जागा जिंकणार. आम्ही कार्यकर्त्यांना सावध राहायला सांगितलं आहे,” असं राऊत म्हणाले. राऊत यांनी विश्वास व्यक्त केला की, “महाराष्ट्रात आता जे सरकार आहे, ते पुन्हा निवडून येणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *