राजकारण

लाडकी बहीण योजनेवर निशाणा, महिलांसाठी एवढे रुपये देण्याचा ठाकरे यांचा वचन

Share Now

उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर हल्ला: “गद्दारांच्या हातात सत्ता देणार का?
नांदेडच्या लोहामध्ये आयोजित प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार हल्ला बोलला. “गद्दार आहेत, माझ्यावर आरोप करतात, विचार सोडले नाही, निवडणूक लढायची असेल तर मर्दा सारखे लढा,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “केंद्रीय यंत्रणांना बरोबर घेऊन लढता, त्यांच्या युतीत ईडी, सीबीआय आहेत. माझ्या कार्यकर्त्यांना तडीपार करता, आता तेवीस तारखेला तुम्हालाही जनता तडीपार करणार आहे.” उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, पुढची सत्ता शिवसेनेचीच येणार आहे. “तुम्हाला सोडणार नाही,” असं इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.

ईडीने ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता केली जप्त; मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई

शिवसेनेचे गद्दारीवर तोडले फटके
“यांनी आपली शिवसेना चोरली, या चोरांच्या हातात, गद्दारांच्या हातात तुम्ही सत्ता देणार का?” अशी थेट टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी त्यांनी नांदेडमधील शिवसेनेच्या ऐतिहासिक कार्याची आठवण काढत, “नांदेडमध्ये शिवसेनेनं खूप मेहनत केली. वसंतराव मला भेटले होते, तेव्हा त्यांनी नांदेडमध्ये मला सभा घेण्याची विनंती केली. मात्र दुर्दैवानं ते आता आपल्यात नाहीत,” असं सांगितलं. त्यांनी वसंतरावांचा वारसदार निवडून द्यावा असं आवाहन करत, “आघाडी धर्म आहे, काँग्रेस राष्ट्रवादीला माझं आव्हान आहे, आमचे उमेदवार तुम्ही निवडून आणा, आम्ही तुमचे उमेदवार निवडून आणतो,” असं त्यांनी म्हटलं.

संजय राऊत यांची राज ठाकरे आणि मोदींवर टीका; ‘भाषा हे हत्यार आहे, आमचं राजकारण परंपरेतून

लाडकी बहीण योजनेवर निशाणा
उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर लाडकी बहीण योजनेवरून तिखट टीका केली. “आर एस एसला मला विचारायचं आहे, 100 वर्ष झाले तुमच्या संघटनेला, पण तुम्ही काय केलं? आता त्यांना कळालं शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला हवं. माता भगिनीला पंधराशे रुपये द्यायला पाहिजे. पण पंधराशे रुपयांमध्ये तुमचं घर तरी चालतं का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले, “महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. आमची सत्ता आल्यावर आम्ही महिलांना 3000 रुपये देणार आहोत.”

नरेन्द्र मोदी आणि अमित शाहवर टीका
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही धारेवर धरलं. “आता मोदी आणि अमित शाह येत आहेत, आता महाराष्ट्रात निवडणूक आहे. सगळे उद्योग तुम्ही लुटून गुजरातला नेले, आणि आता मत मागत आहेत,” असं उद्धव ठाकरे यांनी कटाक्षाने म्हटलं.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *