पाच राज्यातील निवडणुका लांबणार.!
देशातील कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्या वाढत असल्याने तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांच्या निवडणुकां आहेत, याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत निवडणूक आयोगाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाची बैठक २७ डिसेंबरला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग २७ डिसेंबरला मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वी अलाहाबाद हायकोर्टानं निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार सभा आणि रॅली साठी गर्दी होऊ शकते त्यामुळे राजकीय पक्षांनी याबाबत विचार करावा, असा सल्ला दिल्यानं निवडणुकांना ब्रेक लागणार का .? असा प्रश्न राजकीय नेते मंडळींना पडला आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव यांच्या सोबत चर्चा करून निवडणूक आयोग पुढील निर्णय घेईल. कारण पाच राज्याची निवडणूक लागली तर राजकीय प्रचार सभा आणि मेळाव्याना होणारी लोकांनी गर्दी टाळणे शक्य नसेल.
अलाहाबाद हायकोर्टाने उत्तर प्रदेशच्या निवडणूका टाळण्यासाठी सरकारने विचार करायला हवा. निवडणुकांच्या प्रचार सभा आणि रॅली साठी लोकांची गर्दी होऊ शकते त्यामुळे राजकीय पक्षांनी याबाबत विचार करावा, असा सल्ला अलाहाबाद हायकोर्टानं दिला आहे, त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे.