पीयूष गोयल यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत स्पष्ट इन्कार; विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी भूमिका
पीयूष गोयल यांची विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी भूमिका; उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत दिला स्पष्ट इन्कार
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरात सुरू आहे, आणि राजकीय वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीची खिचडी चांगलीच मुरली आहे. भाजप एकीकडे मनसेला सोबत घेण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याची चर्चा पण रंगली आहे. यावर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
पीयूष गोयल काय म्हणाले?
बिझनेस टुडे यांच्या एका कार्यक्रमात पीयूष गोयल यांना उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्याची शक्यता विचारली गेली. यावर त्यांनी “अशा चर्चा किंवा संपर्क झालेल्या नाहीत. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत मजबुतीने उभे आहोत आणि त्यांच्यासोबत आमचं भविष्य आहे,” असं स्पष्ट उत्तर दिलं.
गोयल यांनी पुढे सांगितलं की, “हे सर्व अफवा आहेत. आम्ही महायुतीसह राज्यात बहुमत मिळवणार आहोत. आमचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंतच्या विकसीत राष्ट्राच्या संकल्पात सहभागी आहे.”
शरद पवार: “लाडकी बहीण योजना निवडणुकीनंतर बंद होईल, महाविकास आघाडीची ५ गॅरंट्या
लोकसभा पराभवावर प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीत भाजपला काही जागांवर कमी मतांनी पराभव झाला, आणि महाविकास आघाडीने काही ठिकाणी चांगलं प्रदर्शन केलं. यावर पीयूष गोयल म्हणाले, “आम्ही काही ठिकाणी कमी मतांनी हरले. महाविकास आघाडीच्या विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये मतांचा मोठा फरक नसल्याचं दिसून आलं. 11 जागांवर असाच चित्र होता.”
मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
विधानसभा निवडणुकीसाठी आशावादी दृषटिकोन
गोयल यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आशावाद व्यक्त करत, “आम्ही मोठ्या विजयासाठी तयार आहोत. महायुतीचे सरकार राज्यात बहुमताने निवडून येईल,” असं सांगितलं.
Latest: