राजकारण

बुलढाण्यात संजय गायकवाडांचे गंभीर आरोप: “मातोश्रीवर दहा खोके पोहोचवून रविकांत तुपकरांचा पत्ता कट”

बुलढाणा विधानसभा निवडणुकीत संजय गायकवाडांचे आरोप: “मातोश्रीवर दहा खोके पोहोचवून रविकांत तुपकरांचा पत्ता कट केला”
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत उभी राहिली असून, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा जोरदार दौर सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे.

स्कंद षष्ठीला या पद्धतीने करा भगवान कार्तिकेयची पूजा, जीवनातील अडथळे होतील दूर!

संजय गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती आणि त्यासाठी एबी फॉर्मही तयार ठेवला होता. मात्र, बुलढाणा येथील काही व्यक्तींनी मातोश्रीवर दहा खोके पोहोचवले आणि त्यानंतर तुपकर यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाला, असा आरोप गायकवाड यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

तसेच, गायकवाड यांनी जयश्री शेळके यांच्या पती सुनील शेळके यांच्यावरही गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, नोटाबंदीच्या काळात मुंबईतील लोकांनी राजश्री शाहू बँकेत नोटा बदलवण्यासाठी 1000 कोटी रुपये जमा केले होते. मात्र, सुनील शेळके यांनी केवळ 500 कोटी रुपयेच पाठवले आणि नंतर नोकरी सोडली. गायकवाड यांनी प्रश्न केला, “आजकालच्या मुलांना नोकरी मिळत नाही, पण उपजिल्हाधिकारी पदावर असलेला माणूस नोकरी सोडूच कसा शकतो?”

बुलढाण्यात अटीतटीची लढाई होणार असून, संजय गायकवाड आणि जयश्री शेळके यांच्यात मोठी चुरस असेल.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *