राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे: महाविकास आघाडीला टीका, ‘आम्ही शेतकऱ्यांसाठी काम केले, विरोधक फक्त मारतात गप्पा’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाविकास आघाडीवर टीका: ‘शेतकरी कर्जमाफी केली, आम्ही 10 सूत्री कार्यक्रम जाहीर केला’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. 2014 ते 2019 दरम्यान अनेक प्रकल्प बंद पाडले गेले होते, परंतु आमच्या सरकारने ते प्रकल्प पुन्हा मार्गी लावले, असे शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणी योजनेला विरोध करणाऱ्यांना निशाणा साधत शिंदे म्हणाले, “सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार?”

मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीला चिमटा घेत, विरोधकांच्या कामावर टीका केली आणि म्हटले की, “आम्ही 10 सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. तो फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे.” त्यांनी यावेळी शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख करत सांगितले की, “पूर्वीच्या सरकारला हप्ते घेणं जास्त आवडायचं, परंतु आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कर्जमाफी केली.”

चोरीला गेली किवा हरवली गाडीची आरसी? तर अशा प्रकारे बनवा डुप्लिकेट नोंदणी प्रमाणपत्र

विरोधकांवर तिखट टीका
विरोधकांनी महालक्ष्मी योजना काढली, मात्र त्यांची आर्थिक स्थिती काय, हा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. “कसे 92 हजार कोटी रुपये आणणार?” असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला.

स्वत:च्या कार्यकर्त्यांवर विश्वास
शिंदे यांनी सांगितले की, “मी जर कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिलो नसतो, तर 50 आमदार सत्तेवर लाथ मारून आले नसते.” शिवसेना वाचवण्याचा श्रेय त्यांनी घेतला आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाचवले असल्याचं सांगितलं.

महाराष्ट्र निवडणुकीसाठी शिवसेनेचा यूबीटीची घोषणा पत्र जारी, उद्धव ठाकरेंनी कोणती आश्वासने दिली?

महायुतीचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार
शिंदे यांनी माढा आणि करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विक्रमी मतांनी विजयी होणार असल्याचे आवाहन केलं.

सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहोत
“हे सरकार सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहे,” असं शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या सरकारने 124 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आहे, तर मागील सरकारने केवळ 4 प्रकल्पांना मान्यता दिली. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 350 कोटी रुपये दिल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणजे ‘कॉमन मॅन’
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “CM म्हणजे कॉमन मॅन असावा लागतो. शहराचा व गावाचा विकास झाला पाहिजे. आमचं सरकार रोटी, कपडा आणि मकान देण्यासाठी काम करत आहे.” लाडक्या बहिणींच्या जीवनात परिवर्तन आणण्याचं वचन त्यांनी दिले आणि शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळत असताना, आता 15,000 रुपये देण्याची घोषणा केली.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *