महाराष्ट्र

फडणवीसांचा दावा: मोदींच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा होईल नंबर 1, कर्जमाफीसाठी सरकार ठरवणार मोठा निर्णय

फडणवीसांची धुळ्यात प्रचारसभा:मोदींच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा होईल नंबर 1, कर्जमाफीची ग्वाही
धुळे: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेची सुरुवात आज धुळ्यात झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्ह्याच्या प्रगतीबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आणि विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर टोला-“उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करण्याची सवय अजूनही सुटली नाही

धुळे जिल्ह्याचा भविष्यातील विकास
फडणवीस म्हणाले, “मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत धुळे जिल्ह्यात झालेल्या कामांमुळे येणाऱ्या पाच वर्षात धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर 1 जिल्हा होणार आहे.” त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी झालेल्या कामांची दखल घेत, “सुलवाडे-जामफळच्या माध्यमातून धुळ्याच्या प्रत्येक शेतीला पाणी मिळालं आहे. अक्कलपाडा धरणाची उंची वाढवून धुळे शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई कधीच भासणार नाही,” असं सांगितलं.

कापसाची मोठी आवक, दर खाली, शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट!

रेल्वे, महामार्ग आणि औद्योगिकीकरण
फडणवीस यांनी पुढे स्पष्ट केले की, “मोदींच्या नेतृत्वाखाली मनमाड-इंदूर रेल्वे सेवेच्या माध्यमातून धुळे एक मोठं इंडस्ट्रीज लॉजिस्टिक सेंटर होणार आहे. मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर, धुळे-मनमाड रेल्वे यांच्या एकत्रित विचाराने धुळे जिल्हा औद्योगिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण बनणार आहे.” त्यांनी आणखी म्हटलं, “धुळे जिल्ह्याला सहा राष्ट्रीय महामार्ग मिळाले आहेत.”

महायुतीच्या विजयाचे विश्वास
फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, “धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ महायुतीचं विजय मिळवतील.” त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार करत असलेल्या महिलांविरोधी योजनांबद्दलही भाष्य केलं. “मोदींच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी अनेक योजनांची सुरूवात केली आहे. ‘लखपती दीदी’ योजना आणि 1 रुपयात 8 हजार रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांसाठी सुरू केला आहे. तसेच शेतकऱ्यांना वीज बिल माफीही मिळाली आहे,” असं ते म्हणाले.

कर्जमाफी आणि शेतकरी कल्याण
कर्जमाफीच्या बाबतीत फडणवीस म्हणाले, “आमच्या आशिर्वादाने राज्यात महायुती सरकार आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल. शेतकऱ्यांना MSP पेक्षा कमी भाव मिळाल्यास ‘भावांतर योजना’ राबवली जाईल, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होईल.”

वोट जिहाद आणि विरोधकांवर टीका
फडणवीस यांनी विरोधकांवर आरोप केला की, “धुळ्यात वोट जिहाद केला जात आहे. लोकसभेतील निवडणुकीत आम्ही 1 लाख 90 हजार मतांनी पुढे होतो, पण मालेगाव सेंट्रल आणि धुळ्यातील वोट जिहादमुळे आम्हाला फक्त 4 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.” त्यांनी इशाराही दिला की, “जर आम्ही जागं होऊन मतदारांनी योग्य निवड केली नाही, तर आम्हाला कायमच पराभवाचा सामना करावा लागेल.”

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *