राजकारण

जालना विधानसभा निवडणुकीत प्रतिष्ठेची लढत; भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादीमध्ये चुरस

जालना विधानसभा निवडणुकीत रंगणार तीव्र संघर्ष; शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीत प्रतिष्ठेची लढत
जालना: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे, आणि सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यंदाच्या निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघ मुख्य चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट), भाजपा आणि राष्ट्रवादी (पवार गट) या पक्षांच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत, आणि या पाचही जागांवर कधी कोण बाजी मारेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ
महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे यांच्यात थेट लढत होणार आहे. या जागेवर संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे यांच्यात मुख्य मुकाबला होईल.

तैमूरचे सरकार दोन पायांनी चालवले जात आहे – महाराष्ट्रात भाजपवर खर्गे यांचा मोठा हल्ला

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ
महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे राजेश टोपे आणि महायुती कडून शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण यांच्यात लढत होईल. भाजपचे सतीश घाडगे यांनी बंडखोरी केली असून, ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीत भाग घेत आहेत. त्यामुळे घनसावंगी विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे

बदनापूर विधानसभा मतदारसंघ
महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार नारायण कुचे आणि महाविकास आघाडी कडून शरद पवार गटाचे बबलू चौधरी यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

जालना विधानसभा मतदारसंघ
महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि महायुती कडून शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर यांच्यात थेट लढत होणार आहे. या लढतीत गोरंट्याल आणि खोतकर यांच्यात तणावपूर्ण मुकाबला होईल.

परतूर मंठा विधानसभा
महायुतीकडून भाजपचे बबनराव लोणीकर आणि महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाचे आसाराम बोराडे यांच्यात थेट लढत होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया अपक्ष म्हणूनही निवडणुकीत उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *