राजकारण

अजित पवारांचा राज ठाकरेंवर टोला, ‘पक्ष चोरला’ टीकेवर स्पष्टच बोलले

राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांची प्रत्युत्तर: ‘लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो’ 4 नोव्हेंबर रोजी ठाण्यात आयोजित मनसेच्या उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्यावर टीका केली. “महाराष्ट्रात फोडाफोडीचं घाणेरडं राजकारण शरद पवारांनी सुरु केलं. त्यांनी अनेक वेळा पक्ष फोडले, पण गेल्या ५ वर्षात त्यांनी कळस गाठला. गेल्या ५ वर्षांत आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह देखील घेतलं. शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची आहे,” असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.

नोव्हेंबरमध्ये अक्षय नवमी कधी साजरी केली जाईल? योग्य तिथी, शुभ योग आणि महत्त्व घ्या जाणून

यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर देताना, “काही लोकं वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्यं करत आहेत. काहीजण म्हणतात ‘त्यांनी हे चोरलं, त्यांनी ते चोरलं’, पण इथे चोराचोरी झालेली नाही. लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो. बहुमत ज्या बाजूला असेल, त्या बाजूला निर्णय लागतो. निवडणूक आयोगाकडे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, आणि त्यांनी तो घेतला आहे,” असे सांगितले.

त्यानंतर अजित पवार यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधताना, “कोणीच काही चोरलं नाही. संघटना, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष आणि आमदार यांवर संघटना चालते. संघटना कोणी एकट्या व्यक्तीच्या मालकीची नसते. मी कोल्हापूरला होतो तेव्हा उद्धव ठाकरे वेगवेगळ्या आरोप करत होते. राज ठाकरेंचे बोलणे वेगवेगळे असते. ते कधी काहीतरी बोलून जातात. तुम्ही त्याला महत्त्व देऊ नका. आपलं राज्य पुढे नेण्याची हिंमत कोणामध्ये आहे? प्रशासनावर कोणाचे नियंत्रण आहे? निधी आणण्याची ताकद कोणात आहे?” अशी टीका केली.

अजित पवार यांनी विरोधकांवर तिखट शब्दात टीका करत, आपल्याकडून राज्याच्या विकासासाठी मोठ्या योजना व निधी आणण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Latest:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *