पुन्हा टेन्शन लाॅकडाऊनचे !
परत एकदा लॉकडाऊन लागेल का ?
ती स्तिथी उद्भवेल का हा सध्याच्या घडीला मोठा प्रश्न आहे. देशात ओमिक्रॉनमुळे करोनाची तिसरी लाट येईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. डेल्टा व्हेरिएंटची जागा ओमिक्रॉनने घेतल्यास दररोज १४ लाख नवे रुग्ण आढळू शकतात अशी भीती भारताचे कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केलेली आहे.
पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सुरुवातीला ओमिक्रॉनचा फैलाव वाढू शकतो आणि फेब्रुवारी महिन्यात रुग्णसंख्येचा उद्रेक होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. जर असं झाल्यास पुन्हा लॉकडाऊनसारखे कठोर निर्बंध लावले जाणार का, असा प्रश्न विचारला जात असून केंद्रीय आरोग्य सचिवांनी आज राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना जे पत्र लिहिले आहे त्यातून काही महत्त्वाचे संकेत आहेत.
डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंट तीनपट अधिक वेगाने फैलावत आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक पातळीवर आणि जिल्हा स्तरावर काम करावं लागेल.स्थितीवर नियंत्रण राखण्यासाठी नाइट कर्फ्यू लावला जावा. मोठ्या गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध घालावे, लग्नसोहळा आणि अंत्यसंस्कारासाठी उपस्थितीवर मर्यादा घालाव्या,कार्यालये, कंपन्या, उद्योग, सार्वजनिक वाहतूक सेवा येथेही उपस्थिती कमी करण्याबाबत यात सूचित करण्यात आले आहे. स्थितीनुसार हा निर्णय घेतला जावा, असं मात्र स्पष्ट करण्यात आलं आहे.
सध्याच्या घडीला सार्वधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून देशातील जवळ जवळ १४ राज्यांमध्ये ओमिक्रोन पसरलेला आहे. सध्या ओमिक्रोन ची संख्या देशात २२०वर पोहोचली आहे.