यंदाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम.
आज पासून विधिमंडळ अधिवेशनाला सुरवात होणार आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव यंदाचं अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार आहे. आज मुख्यमंत्री अधिवेशनात उपस्थित राहणार का ? असा प्रश्न विरोधकांना सोबतच सर्वांना पडला आहे.
आज सकाळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आजारी असल्याने गैरहजर असणं साहजिक आहे. पंरपरा ही आहे की कोणाला तरी पदभार द्यावा लागतो आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते. अन्य दोन पक्षांवर अविश्वास असं स्वाभाविक आहे, कारण पदभार घेतला तर सोडणार नाहीत. पण त्यांच्या पक्षातील कोणावर विश्वास नसेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार दिला पाहिजे,” असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंकडे पदभार का देत नसावेत असं विचारलं असता त्यांचा बहुतेक मुलावरही विश्वास नसावा असा टोला लगावला.
यावर जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील उत्तर दिलं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आहे, त्यांनी आमच्या बैठकीत सहभाग घेतला, त्यामुळे मुख्यमंत्री कधीही सभागृ येतील.
कुणालाही चार्ज देण्याची गरज नाही, घरूनच मुख्यमंत्री काम व्यवस्थित करत आहेत.