वरुण गांधी पुन्हा बरसले खासगीकरण धोरणावर टीका !
लखीमपूर हिंसाचारावरून आपल्या पक्षावर नाराज वरुण गांधी यांनी पुन्हा नाराजी व्यक्त केली असून आता केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणावर त्यांनी हल्ला चढवला आहे. वरुण गेले अनेक दिवस आपल्या पक्षावर नाराज आहेत आणि त्यांनी वेळोवेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र सोडल्याचे दिसत आहे. आताही त्यांची नाराजी त्यांनी जाहीर करत टिक केली आहे.
खासगीकरणामुळे कोट्यवधी लोकांचा रोजगार बुडत असून यामुळे तरुण वर्ग सैरभैर झाल्याचे ते म्हणाले. खासगीकरणाच्या नावावर सगलं काही विकल्या चाललंय.. हे चूक असून खासगीकरण आणि इ-कॉमर्स च्या माध्यमातून जे सुरु आहे त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पीलभीत येथे व्यवसायिकांसमोर बोलताना त्यांनी हे भाष्य केले आहे.