बिझनेस

शेअर बाजार ‘उठला’ सेन्सेक्स पुन्हा खुंटला

Share Now

ओमायक्रॉनची दहशत जगभरात पसरू लागली आहे, युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेपाठोपाठ भारतातही रुग्ण वाढत आहेत. यातच आता जगभरातील शेअर बाजार ओमायक्रॉनच्या छायेत आहेत. ओमायक्रोची धास्ती आणि भविष्यातील लॉकडाऊनची भीती यामुळे मुंबई शेअरबाजारही गडगडला असून बाराशे अंशांची ही घसरण गुंतवणूकदारांचे साडेसहा कोटी लाख रुपयांचे नुकसान करणारी ठरली.

शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय असल्याने सतत जगभरातील घटना घडामोडींचे पडसाद बाजारात उमटत असतात आणि याचा परिणाम नेहमीच बघायला मिळतो. दोन मुख्य कारणं ज्यामुळे झाली ही घसरण : १) ओमायक्रॉनचा वाढत प्रभाव आणि या भीतीमुळे झालेली विक्री.
२) जगभरात निर्माण होणाऱ्या अस्थिरतेमुळे परकीय वित्त संस्थांनी केलेली मोठी विक्री.

झालं असं की, जगभरात जेव्हा ओमायक्रोन पसरू लागला तेव्हा अनेक देशांनी निर्बंध लागू केले, याचा परिणाम असा झाला की, पुरवठा साखळीवर परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली. त्यातच अमेरिका, युरोप मधील मोठ्या बँकांनी कडक धोरण स्वीकारले आणि यामुळे गुंतवणूकदारांची मानसिकता बदलली , त्यांनी शेअर विक्री सुरु केली. एकूणच जग पुन्हा एकदा अस्थिरतेकडे वाटचाल करू लागले असून याचे पहिले उदाहरण म्हणून शेअर बाजाराकडे बघता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *