मलिकांनी केली पुन्हा टीका कारवाई म्हणजे सुडाची मालिका !
आज नवाब मलिक बीड दौऱ्यावर आहेत, नवाब मलिक यांनी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे, किरीट सोमय्या आणि देवेंद्र फडणवीस याच्यावर आरोप केले. कारण नवाब मलिक यांची यांची देखील ईडी कडून चौकशी होण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस याना ओएसडी आणि किरीट सोमय्या याना केंद्रीय तपस यंत्रणेचा प्रवक्ता करायला हवं. असं विधान मलिक यांनी केले आहे.
या देशात केंद्रीय यंत्रणाच गैरवापर काही थांबत नाही, उत्तर प्रदेश मध्ये निवडणूकीत पराभव होण्याची शक्यता दिसत असताना समाजवादी पार्टीच्या काही नेत्यावर कारवाई सुरु झाली आहे. विरोधी पक्षनेते केंद्रीय यंत्रणेला सूचना देतात की, नोटीस पाठवा यामुळे देवेंद्र फडणवीस याना ओएसडी करायाला हवं, त्याचबरोबर किरीट सोमय्या हे देखील वारंवार आरोप करत असतात. त्यांना केंद्रीय तपास यंत्रणेचा प्रवक्ता करायला हवं.
माझ्या विरोधात कितीही कट कारस्थान रचलं तरी मी कुणालाही घाबरणार नाही. असे मलिक यांची माध्यमाशी बोलताना सांगितले यांनी कितीही यंत्रणेचा वापर केला तरी हे सरकार पडू शकणार नाही. सरकार पूर्ण पाच वर्ष टिकेल. अमित शहा सांगत आहेत. राजीनामा द्या आणि निवडणूक घ्या , पहिले तुम्ही राजीनामे द्यायला हवे, कारण आधी लोकसभेची निवडणूक झाली आहे.अमित शहा याना देखील नवाब मलिक यांनी प्रतिउत्तर दिले.