मिडिया कॉन्शिअस पंतप्रधान अचानक तिच्या पाया पडले !
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेत आले की कायम जागरूक असतात ते आपल्या पेहरावाबद्दल आणि आपल्या प्रत्येक कृतीबद्दल. फोटोग्राफरला पोज देण्यात तर त्यांचा हातखंडा. मग तो लाखोंचा पेहराव असेल किंवा समुद्र किनारी गोळा केलेले प्लास्टिक असेल. किंवा मग त्या त्या राज्यात गेल्यावर तिथला पारंपरिक पोशाख. मोदी फ्लॅश ची कोणतीही कसर सोडत नाहीत. परवाच्या वाराणसी दौऱ्यात तर पदोपदी याची प्रचिती येत असते. रात्री अचानक प्रोटोकॉल मोडत ते रेल्वेस्टेशनवर फेरफटकाही मारून आले. अचानक असले तरी सोबत फोटोग्राफर आवर्जून !
मागील दोन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यावर अशी एक घटना घडली की त्यामुळे नरेंद्र मोदीच कौतुक होत आहे. एक दिव्यांग महिला त्यांना भेटली आणि त्यांच्या पाया पडण्यासाठी पुढे आली. मात्र पंतप्रधानांनी महिलेला मध्येच थांबवलं आणि स्वतः त्या महिलेच्या पाया पडले. यावेळी ती महिला भावूक झाली आणि हात जोडून मोदींसमोर उभी राहिली. यानंतर पीएम मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही त्या दिव्यांग महिलेशी संवाद साधला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.