२१ वर्षानंतर भारतीय तरुणी मिस युनिव्हर्स

“मिस युनिवर्स २०२१” चा ‘किताब भारताच्या हरनाझ संधूनं जिंकला आहे. २१ वर्षीय हरनाझला १२ डिसेंबर रोजी इस्रायलच्या इलात येथील युनिव्हर्स डोममध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट देण्यात आला.
तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा ‘किताब मिळाला आहे. याआधी २१ वर्षांपूर्वी लारा दत्ताने २००० साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. हरनाझ संधू च्या विजयाची बातमी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली. इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात हरनाझला मुकुट दिल्याचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.

कोण आहेत हरनाझ संधू –

चंदीगडच्या हरनाझ संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.
हरनाझ संधू हिने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता.
२०१८ मध्ये, तिला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८ चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला. तिथे तिने टॉप १२ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले.
या वर्षी सप्टेंबरमध्ये तिने मिस दिवा युनिव्हर्स इंडिया २०२१ चा मुकुट पटकावला. ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *