महाराष्ट्र

हे आहेत दहा गुणवैशिष्ट्य ज्यांनी पवारांना ‘पॉवर’ दिली

Share Now

 

देशातील राजकारणात आज शरद पवार हे लाईट हाऊस -दीप स्तंभ मानलं जाणारं नाव आहे, पवारांचा करिष्मा दोन वर्षांपूर्वी उभ्या देशाने बघितला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष त्यांनी विरोधीपक्षात बसवून नवे समीकरण जुळवत महाराष्ट्रात अकल्पित सत्ताकारण केलं. सतत कार्यमग्न पवार आज वयाची ऐंशी वर्ष पूर्ण करत आजही ऍक्टिव्ह मोड मध्ये. असे कोणते गूणवैशिष्ट्य आहे ज्यांनी पवार यांना “पॉवरफूल” केलं !

शरद पवार देशाच्या राजकारणातील एक अविभाज्य घटक आहेत. राज्य आणि देशाच्या राजकारणात त्यांना दुर्लक्षित करून तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. त्यांचा एक निर्णय संपूर्ण राजकीय समीकरण बदलत असतो. मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रात मंत्रीपदी असताना त्या त्या खात्यांना त्यांनी दिलेले नवे आयाम, घेतलेले निर्णय यांचा ठसा अजूनही कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच देशात एक वेगळी ओळख आहे. राज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान तसेच महिला आरक्षण हा निर्णय त्याच्या कारकीर्दत झाला आहे.
*या दहा गुणवैशिष्ट्यांमुळे पॉवर बाज नेते

१- संघटन कौशल्य : महाविद्यालयीन काळापासूनच संघटन कुशलता, आंदोलने आणि संघटन बांधणी या,यामध्ये सामाजिक गणितं आणि माणसाची उपयुक्तता जाणणे.

२- अफाट स्मरणशक्ती : चकित करणारा हा गुण आहे, आजही पन्नास साथ वर्षांपूर्वी भेटलेली व्यक्ती आणि प्रसंग जशास तसे आठवणीत ठेवून त्याचा अचूक उपयोग .

३ – अभ्यासू वृत्ती – वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आणि संदर्भ ग्रंथ यांचा व्यासंग आणि विविध क्षेत्रातील अभ्यासक आणि विचारवंतांच्या संपर्कातून त्यांच्या विषयाचे जाणून घेण्याचा प्रयत्न.

४- चिकित्सक वृत्ती : विषय कोणताही असो तो समोर आला तर शांतपणे समजून घेणे आणि त्याचा सर्वांगीण विचार करणे.

५- दूरदृष्टी : राजकीय, सामाजिक आणि पदावर असताना भविष्यातील परिणाम जाणून निर्णय घेण्याचे कौशल्य. यासाठी सातत्याने प्रवाही विचार.

६ -संयम – अतिशय संयमी राजकारणी म्हणून त्याची ओळख आजही आहे , घडलेली घटना किंवा आरोपांना अविचारी प्रत्युत्तर आजपर्यंत दिलेलं नाही.

७- प्रबळ इच्छाशक्ती – आजपर्यंत शरद पवारांनी ज्या ज्या क्षेत्रांत पाऊल टाकलं त्यात त्यांचं यश हे इच्छा शक्तीची जोड असल्यानेच. शारीरिक व्याधीवरही मात करत याच बळावर आजही कार्यमग्न.

८- धैर्य – पक्ष स्थापन केला आणि जवळपास १५वर्ष सत्तते काढली, परंतु २०१४ च्या निवडणूकीनंतर पक्षाला लागलेली गळती. धैर्य बाळगून पुन्हा पक्षाला पूर्वपदावर आणलं.सत्ता मिळवून दिली.

९- नेतेपद सांभाळणे : यासाठी कायम कार्यकर्ता सांभाळावा लागतो, नुसता सांभाळावा नाही तर वेळप्रसंगी घडवावा लागतो, आज त्यांच्या पक्षात उभी राहिलेली दुसरी फळी हे त्याचे फलित आहे. यासाठी पुरेसा वेळ कार्यकर्त्यांना देणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहे.

१०.- राजकीय समज-चातुर्य : या गुणामुळे अनेकदा धक्कातंत्राचा अवलंब करत विरोधकांना आणि वेळप्रसंगी स्वपक्षीयांना देखील चकित करण्याची शैली असल्याने राजकीय वाटचालीत पवार काय करू शकतील याचा अंदाज न येणे हा कायमचा शिक्का.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *