ओबीसींचा आक्रमक पवित्रा मोर्चा – चक्का जाम चा इशारा
ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या स्थगिती मिळाली आता त्यांना डावलत राज्यात निवडणुका होतील असं चित्र आहे. सरकारमध्ये यावरून दुफळी निर्माण झालेली असतानाच आता ओबीसी व्हिजे एनटी मोर्चाने नवा इशारा दिलाय. ‘ महाराष्ट्रात ओबीसींना डावलून नगरपंचायतच्या निवडणुका होत आहेत. हे दुर्दैवी आहे. यामुळे पाचशे लोकांचे राजकीय भविष्य धोक्यात आले आहे, असे होऊ देणार नाही. आता निर्णायक भूमिका म्हणून केंद्र आणि राज्य सरकार विरोधात ओबीसी व्हीजे एनटी जन मोर्चा येत्या १७ डिसेंबर रोजी राज्यात विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार’ अशी घोषणा ओबीसी व्हिजे एनटी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केले आहे.
राज्यातील ओबीसींच्या समन्वयकांशी चर्चा करून हा निर्णय झाला असे बीडमध्ये बोलताना सानप यांनी सांगितले. चक्काजाम आंदोलन अंतर्गत राज्य सरकारने काही ठोस निर्णय नाही घेतला तरी मंत्रालयावर थेट मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.
ओबीसींना न्याय मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नये असेही नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारने इंपेरिकल डेटा सुप्रीम कोर्टाला द्यावा, त्याबरोबरच मंत्री मंडळाच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्याचा ठराव मंजूर करण्यात यासह विविध मागण्यांसाठी हे चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे.