सात वर्षात २८०० विदेशी कंपन्या बंद : केंद्र सरकारची माहिती
२०१४ पासून देशभरात सुमारे २८०० विदेशी कंपन्या बंद झाल्या आहेत. गेल्या सात वर्षात एकूण २७८३ कंपन्यांनी भारतातील आपला व्यवसाय बंद केला आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. भारतातील व्यवसाय बंद करणाऱ्या या विदेशी कंपन्यांची नोंदणी संपर्क कार्यालय, शाखा कार्यालय, प्रकल्प कार्यालय किंवा उपकंपन्यांमार्फत करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री म्हणाले.